स्वत:ची वेबसाईट रजिस्टर करा फक्त ७५ रु. मध्ये ..!!

Tuesday, October 1

४०,००० नवे, जुने भारतीय, वर्ल्ड सिनेमे, जुन्या सुंदर आणि सुरेख टी.वी.सिरियल्स घरबसल्या ऑनलाईन पहा..!!!!

४०,००० नवे, जुने भारतीय, वर्ल्ड सिनेमे, जुन्या सुंदर आणि सुरेख टी.वी.सिरियल्स घरबसल्या ऑनलाईन पहा......!!!!

कित्ती छान वाटते ना हे वाचुन..???

लहानपणीच्या - म्हणजे १९९० च्या दशकातल्या गोल्डन युगातल्या टी.वी सीरियल्स, सिनेमे अजुनही एव्हर ग्रीन म्हणुन आपण पहात रहातो... !!!!

१००० चैनल्सच्या पसार्यात अचानक कोणत्यातरी चैनलवर एखादा जुना गाजलेला दिलीपकुमार्, राज कपुर्, देव आनंद यांचा पिक्चर लागला की आपला हात रिमोट्वरुन लगेच बाजुला होतो आणि आपण त्या सोनेरी क्षणांमध्ये पुन्हा एकदा हरवुन जातो...!!!!!
त्या काळातील सिरियल्स सुद्धा कित्ती आशयघन आणि नितांत सुंदर होत्या....

बुनियाद्, मालगुडी डेज, व्योमकेश बक्षी, विक्रम वेताल, अरेबियन नाईट्स, हम लोग, महाभारत्, रामायण, गुल गुलशन गुलफाम अजुन कितीतरी मोठ्ठी लिस्ट होईल ही.. :-)

वरील टायटल देण्याचे कारण हेच आहे कि माझे सुद्धा हेच मत झाले जेव्हा मी ते वाचले की - ४०,००० नवे, जुने भारतीय, वर्ल्ड सिनेमे, जुन्या सुंदर आणि सुरेख टी.वी.सिरियल्स घरबसल्या ऑनलाईन पहा... असे झाले तर भारताच्या बाहेर आहे असे कधीच वाटणार नाही..

आणि नेहमी नेहमी रटाळ्, कंटाळ्वाण्या सास-बहु छाप किंवा विवाहबाह्य संबंध सारख्या दाखवणार्या मालिकांपेक्षा हे भारतीय आणि जागतिक दर्जाचे सिनेमा पाहणे कधीही चांगले...आणि ते सुद्धा अतिशय माफक दरात्..

ऍमेझॉन सारखी जगातील नंबर १ कंपनी जर अशी मस्त ऑफर देत असेल तर ती न घेणे हा वेडेपणा नाही काय..??
:-)
आपला लॅपटॉप घेउन आपले निवांत कोणत्यातरी कोपर्यात पडायचे आणि खुशाल आपल्या त्या रम्य जुन्या आठवणींमध्ये रमायचे..!!

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि स्वत:च पहा...ज्या कारणासाठी ऍमेझॉन ही जगात नंबर १ ला पोहोचली आहे ती म्हणजे कस्ट्मर सटिसफॅक्शन.....

त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ३० दिवस मोफत अनुभव घ्या....

त्यानंतर आवडले, पटले तरच पुढे सुरु ठेवा अन्यथा एक रुपया सुद्धा खर्च होणार नाही..!!!!


Wednesday, November 28

आपण यांना पाहिलंत का ???


मला आठवते कि लहानपणी दुरदर्शन वर  "आपण यांना पाहिलंत का ?" हा पाच मिनिटांचा कार्यक्रम लागायचा..
जो आम्हा मुलांचा खूप म्हणजे खूपच फेवरेट होता ..!!
याचे कारण असे होते कि -  त्यात हरवलेले लोक घरातून पळून जात आणि त्यांचा फोटो दाखवत असत आणि आम्ही मुले -
"अरे याला तर कालच गावात पाहिला..!, 
"याला तर सकाळीच देवळात दर्शन घेताना बघितले.. !" असे उगीच बरळत असु..! 

लहानपणी त्यात गंमतीचा भाग जास्त होता..!!
त्यातील गमतीचा भाग सोडला तर आम्हाला त्या बातमीशी काहीच घेणे देणे नसे ..

हे सगळे आता आठवायचे कारण म्हणजे  वास्तवातील आकडेवारी खूप भयानक चित्र समोर दाखवते.. आणि ते म्हणजे जवळ जवळ रोज ४२ जण बेपत्ता होतात..!

बेपत्ता म्हणजे थोडक्यात 'घरातून न सांगता निघून जाणे' अथवा 'पळून जाणे..'

सध्या आपण किती फास्ट युगात जगत आहोत कि ज्यात डोके ठिकाणावर असलेला किंवा असलेली जर कुणी मोठी व्यक्ती हरवली तर तिला जेणेकरून शोधायला जास्त अडचण येणार नाही,
पण पोलिसांकडील उपलब्ध रेकॉर्ड अनुसार १८ वर्षांवरील जे शहाणे लोक आहेत (म्हणजे जे प्रस्तुत अर्थाने वेडे नाहीत - जे आपण  स्वत: काय करीत आहोत ते जाणतात असे) त्यांची आकडेवारी ८३ हजार ५०० इतकी आहे..! यामध्ये खंडणी किंवा अन्य कारणास्तव अपहरण केलेली मंडळी नाहीत.!!

या ८३ हजार ५०० त सर्वाधिक ८0 टक्के लोक हे स्वत:हून निघून गेलेले आहेत.!!

वरिष्ठ अधिकार्‍यांकडून समोर आलेल्या सरकारी माहिती नुसार याची वेगवेगळी कारणे अशी आहेत:-  
  1. प्रियकर अथवा प्रेयसीबरोबर पळून जाणे (२० टक्के)
  2. समाजातील स्पर्धात्मक वातावरणात न टिकण्याची भीती यामुळे निघून जाणे (सर्वात जास्त प्रमाण  ६० टक्के
  3. घरच्यांच्या त्रासाला वैतागून निघून जाणे, (यात विशेष करून बायकोच्या त्रासाला वैतागून निघून गेलेल्या पुरुषांची संख्या जास्त आहे..!!)
  4. नोकरीसाठी न सांगता निघून जाणे (याचे प्रमाण कमी आहे)


 ही आहे फक्त देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून हरवल्या जाणार्‍यांची धक्कादायक संख्या. जर संपूर्ण भारताचा विचार केला तर काय आकडेवारी समोर येईल याचा विचारच मनात धडकी भरवतो..!!

गेल्या सात वर्षांत जवळ जवळ ८३ हजार ५०० जण "बेपत्ता" या वर्गात मोडतात त्यापैकी १0 हजार ६०० जणांचा पोलिसांना अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही... आणि आता शक्यता सुद्धा कमीच दिसते आहे.. कारण यांमध्ये सगळे "आम आदमी" आहेत..

विशेष म्हणजे दर महिन्याला जवळपास ११५0 तर दिवसाला ४२ जण शहरातून गायब होत आहेत....
इतक्या वर्षांत हरवलेल्या व्यक्तींमध्ये जास्त करून १५ ते ३५ वयोगटातील लोक आहेत. त्यात स्त्रियांची संख्या त्यामध्ये फक्त २२ हजार इतकी कमी आहे. !!!

पोलिसांना एकूण सापडलेल्या लोकांची संख्या ७२ हजार ४००. १०५०० हून जास्त अजूनही बेपत्ता आहेत.
सापडलेल्या लोकांमध्ये ६७५ जण मृतावस्थेत सापडले होते.

गायब झालेल्यांपैकी मृतावस्थेत सापडलेल्या लोकांची कारणे:- 
  1. अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली असावी. 
  2. काहींनी पळून गेल्यावर स्वखुशीने आत्महत्या केली असावी
  3. नैराश्याने काहींनी आत्महत्या केली असावी
  4. काही अपघातात ठार झालेले असावेत. 
वरील आकडेवारी ही पोलीसांकडे नोंद झालेली आहे आणि म्हणूनच खरोखर "बेपत्ता" झालेल्यांची आकडेवारी जवळजवळ दुप्पटीने जास्त असण्याची शक्यता आहे.. ! 

अजून काय कारणे असावीत युवा पिढीने इतकी टोकाची भूमिका घेण्याची ?? 
इतक्या जास्त प्रमाणात घर सोडून जाण्यासाठी लोक का मजबूर होतात..??
कुटुंबात असलेली "नो केअरिंग अटिट्युड"..???
कि "ओव्हर प्रोटेक्टेड" वातावरणात सांभाळल्यामुळे आलेली स्वत:बद्दलची भीती?
लोकशाही देशात राहून हुकुमशाही पालकांनी स्वत:च मुलांवर लादलेल्या अतिमहत्वाकांक्षी अपेक्षा ?
आणि त्या अवास्तव अपेक्षा पूर्ण न करता आलेली, भीतीने घाबरलेली असंख्य मुले?
या डिप्रेशन मुळे १४ ते २० वयातील मुले मुली नको त्या मार्गाला लागलेली उदाहरणे आपण हताशपणे पहात आहोतच.. !  
आणि जे तरुण तरुणी या सगळ्या चुकीच्या स्पर्धात्मकतेला बळी पडत आहेत त्यांचे काय?
जर शहरात हि स्थिती असेल तर गाव खेड्यांमध्ये काय अवस्था असेल..?

...................
       

Tuesday, January 24

येथे तिरंगा विकला जातो'..........

__'येथे तिरंगा विकला जातो'___

या वर्षीचा प्रजासत्ताक दिन जसा जवळ आला,
डोक्यात आमच्या एक जबरदस्त प्लान चमकला !
चला, या वर्षी सगळा आळस झटकुन टाकुयात,
आपल्याच अंगणात डौलाने मस्त तिरंगा फडकावुयात !

भरपूर उत्साहात २ तास सगळे मॉल पालथे घातले,
शेवटी कोप-यावर छोटेसे १ दुकान नजरेस पडले,
'येथे तिरंगा विकला जातो' पाटीवर लिहिले होते !
दिसते तसे नसते हे आम्हाला नंतर उमगले होते !!

दुकानदाराला म्हटले आम्ही अभिमानाने 'तिरंगा पाहिजे एक'
त्याने न्याहाळुन विचारले 'ओरिजिनल की डुप्लीकेट'
चवताळुन ओरडलो, 'आजादी' नंतर डुप्लीकेट कशाला फडकावणार?
बसा, बसा, त्याने म्हटले, तुमच्या सारखे पुन्हा कधी केव्हा येणार?

ओरिजिनल मधे कुठला दाखवू नवा की जुना घेणार?
चक्रावून आम्ही विचारले त्यात असा काय फरक असणार..?
हसून त्याने मग माळ्यावरचे मोठे बण्डल उघडले !
जुना तिरंगा कुणी किती वेळा फडकावला,
याचे गणित आमच्यासमोर मांडले !!

नविन कालच शिवून आलेत त्याने दिमाखात सांगितले !
जुन्यामधे खुप 'व्हरायटी' आहे पुढे ज्ञान पाजळले !!
मग आमच्या समोर त्याने झेंड्याचा मोट्ठा बण्डल उघडला !
बोलला, हा अमिताभने फडकावलेला, मागच्या वर्षी 'आझाद पार्क' वर !!
हा 'शाहरुख खान' ने फडकावलेला 'होटल ताज' वर !
हा फडकावलेला 'आमिर' ने 'मंगल पाण्डे' च्या सेट वर !!
हा झेंडा स्पेशली पॅरिसच्या फैशन डिजायनर ने शिवलाय !
हात जरा संभाळुन लावा मिस्टर तुमचा हात मळलाय !!

एक मागोमाग एक त्याने खुप झेंडे दाखवले !
राज कपूर ते बिपाशा बसू सगळ्यांचे पाढे वाचले !!
आम्ही म्हटले भारतीय सेनेच्या ख-या शहीद ने !
फडकविलेला खराखुरा तिरंगा दाखवणार?


तो बोलला ठेवला होता ना, पण यापुढे नाही ठेवणार !!
तो झेंडा "कॅप्ट्न मनोज पांडेने" "कारगिल" वर फडकावला होता !
अभिमानाने तेव्हा आमचा ऊर केवढ़ा दाटून आला होता !!
मी ख़ास 'पाच हजार' रुपये मोजून तो मागवला होता !

मोट्ठ्या दिमाखात सगळ्यांसमोर या शोकेशमधे झळकावला होता !!
तीन वर्षे ठेवुनहीं त्याला एकही कस्टमर दिसला नव्हता !
अहो खुप कष्टाने शेवटी अडीच हजारात खपवला होता !!
आम्ही म्हटले ठीकाय, नविन मधला दाखवा !

तो म्हटला कोणत्या ब्रँडचा हवाय ते आधी ठरवा !!
'रीतू बेरीचा' दाखवू की 'मुनमुन सेन' चा ?
पॅरिसच्या डिजायनरचा की 'मनीष मल्होत्रा' चा ?
आम्ही म्हटलो भाऊ महिन्याची १३ तारीख आहे आणि महागाई मस्त आहे !
असाच झेंडा दाखवा जो आमच्या खिशाला स्वस्त आहे !!

एकच शेवटचा पीस उरलाय लगेच तुमच्या नावावर करा !
त्या आधी काउंटरवर एक हजार रुपये जमा करा !!
आम्ही म्हटले एक हजार रुपये जरा जास्त नाही वाटत ?
तो ओरडला तुम्हाला आर्ध्या किमतीत देतोय मिस्टर जास्त पैसे नाही लाटत !

मनात विचार आला आजादी पूर्वी झेंडा जर इतका महाग असता !
कुणी कुणी जीवाची बाज़ी लावून तिरंगा फडकावला असता ?
हजार रुपये मोजण्यासाठी आम्ही स्वताला तैयार करत होतो !
डोळ्यांसमोर मात्र मुलांची फी, बायकोचा रागीट चेहरा पहात होतो !!
समस्या मोठी जटिल होती आणि सुटायला जरा कुटिल होती !

इतक्यात दुकानदाराचा चेहरा तोंडभर हास्याने खुलला !!
जेव्हा आमचाच झेंडा एका विदेशी कपलच्या नजरेस पडला !
दूकानदाराचा रंग इतक्या पटापट बदलला होता !!
जणू कुबेराचा खजिनाच त्याच्या नजरेस पडला होता !
आमच्या खालचा स्टूल खसकन ओढून त्याने तिच्या खाली सरकवला !!
मधाळ इंग्रजी त्यांना तुच्छ कटाक्ष आमच्याकड़े भिरकावला !
इतिहासाने पुन्हा एकदा स्वताला सिद्ध केले होते !!
नियतीने आम्हाला पाहुन विकट हास्य केले होते !

आमच्या पसंतीचा तिरंगा विदेशी मेमला आवडला होता !!
दूकान दारानेही तेवढ्याच खुबीने त्याचा भाव बदलला होता !
इंग्रजांच्या हाती आता पैशांचा जोर होता !!
पाहता पाहता तिरंगा आमचा इंग्रजांना विकला जात होता !
आमचा डोळ्यांदेखत आमचा तिरंगा विकला गेला होता !!

दुकानदाराचा चेहरा शंभर डॉलर्स पाहुन कमालीचा खुलला होता !
जाता जाता तिरंगा आम्हाला पुन्हा रडवुन गेला !!
मनावर दुखद गोष्ट कोरुन अंतर्मुख करून गेला !
डॉलर च्या तुलनेत रुपयाचा जगात आज काय भाव आहे !!
कारण सगळीकडे डॉलर वाल्यांनाच मान आणि भाव आहे !

म्हणायला आपण म्हणतो भारत स्वतंत्र झाला आहे !!
पण आर्थिक दृष्टया आजही रूपया डॉलरचा गुलाम आहे !
एमबीए घ्या, डॉक्टर घ्या, किंवा घ्या सॉफ्टवेर इन्जिनेयर,
सगळ्यांचेच ठरलेले ध्येय आहे ऑनसाईटची मोट्ठी ऑफर !!

आख्या जगात जाउन हेच मग डॉलर ला अजून स्ट्रोंग बनवतात !
कधीतरी कुठेतरी एखाद पारितोषिक मिळवतात !!
भारताला मात्र त्यांचा कधीच काहीच फायदा होत् नसतो !
तरीसुद्धा भारतीय वंशाचे म्हणून आम्ही त्यांचे गोडवे गात असतो !!~जमीर इब्राहिम "आझाद".. 
beyond.thinking@gmail.com